""मराठी अंतरंग या साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे""

शुभ सकाळ

" स्पष्ट " बोला पण असे बोला कि समोरच्याला " कष्ट " होणार नाही
अन् त्याचे आणि तुमचे नाते "नष्ट "  होणार नाही.."
प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे  असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.
शुभ सकाळ
**************************************************************
"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.
काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."
शुभ सकाळ
**************************************************************
               "शुभसकाळ"  
              म्हणजे केवळ
            शुभेच्छा देण्याची
          औपचारीकता नव्हे ...
                     तर
        दिवसाच्या सुरुवातीच्या
     पहील्या मिनीटाला मी तुमची
             काढलेली सुदंर
               आठवण "
              शुभ सकाळ
**************************************************************
स्वताः पेक्षा दुसऱ्या वर जास्त विश्वास ठेवाल तर योग्य पर्याय नक्की मिळतो
         शुभ सकाळ
**************************************************************
"अंदाज" चुकिचा असू शकतो पण
"अनुभव " कधीच चुकिचा असू शकत नाही ,
कारण...
"अंदाज" आपल्य मनाची "कल्पना" आहे
"अनुभव"आपल्या जीवनातील "सत्य"आहे .
  शुभ  सकाळ
**************************************************************
डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||
**************************************************************
देवाच्या  मंदिरात   एकच
     प्रार्थना   करा , सुखी   ठेव  तिला
     जिने  जन्म  दिलाय  मला . . .
      *शुभ सकाळ *
**************************************************************
"परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,
पण चमकतो तोच...
जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो."
  शुभ सकाळ
**************************************************************
दुसऱ्याच्या दारात सुखाचे
झाड लावले कि आनंदाची
फुले आपल्या दारात पडतात...
शुभ सकाळ
**************************************************************
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं .....
आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.....
एक माणुस वीस~पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही..
पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो..
       शुभ सकाळ
**************************************************************
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे.
 आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे...
"Life is very beautiful"
शुभ सकाळ
**************************************************************
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्यांची साथ,
तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…
शुभ सकाळ
**************************************************************
कोणतीही व्यक्ति तुमच्या जवळ तीन कारणांमुळे येते...
प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे.
 प्रेमामुळे आली तर प्रेम द्या,
कमतरतेमुळे आली तर मदत करा,
आणि ..
जर तुमच्या प्रभावामुळे आली असेल तर, स्वतःला भाग्यवान समजा आणि आनंदी रहा,
कारण...
देवाने तुमच्यामध्ये एवढी क्षमता दिली आहे म्हणुन...!!
शुभ सकाळ
**************************************************************
मी आहे ना तू घाबरू नकोस
या शब्दात एवढी ताकद आहे कि
कमजोर व्यक्तिला कोणतेही आव्हान ऊचलण्यासाठी एक प्रकारचे शरीरात दिले जाणारे ग्लोकोजच आहे.
संकटाला  नेहमी दिलासा देणार हे एक प्रथमोपचार आहे.
*मी तुमची प्रत्येक अडचण सोडवू शकेल का हे मला माहित नाही, पण तुमच्या प्रत्येक अड़चणीत मी तुम्हाला.....एकटे सोडणार नाही हे मात्र नक्की ....
|| शुभसकाळ ||
**************************************************************
थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण
पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करत...
म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...!
अगदि आपल्या आई-वडीलांसारख....!!
शुभ सकाळ
**************************************************************
शब्दगंध
आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं.
सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही.
भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही.
हे जीवन एक गुपित आहे,  इथे सर्व काही लपवावं लागतं,
मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं.
शुभ सकाळ
**************************************************************
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ सकाळ
**************************************************************
स्वतःला असे तयार करा की
तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात
पकडून पुढे  जाण्याची इच्छा
निर्माण झाली पाहिजे.....✍
शुभ प्रभात
**************************************************************
कधी कधी बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही,
मी तुमच्यासाठी शांत आहे,
कारण तुम्हाला गमवायची माझ्यात हिम्मत नाही…
शुभ सकाळ
**************************************************************
माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!!
शुभ सकाळ…!!
**************************************************************
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
|| शुभ सकाळ ||
**************************************************************
"रावणाला नारदांनी विचारले" "तुला मायावी रुप घेता येते. मग, सीता मातेला ‘वश‘ करायला तू ‘रामा‘ चा ‘वेष‘ घेऊन तिला का नाही ‘फसवलेस‘?"
रावणाने ‘स्मितहास्य‘ करून उत्तर दिले, "मी तसा ‘प्रयत्न‘ सुध्दा केला. पण "रामा चा वेष धारण" केल्यावर माझ्या ‘मनात‘ ते ‘वाईट विचारच‘ आले नाहीत.
 बोध
चांगल्या विचारांच्या माणसांशीच मैत्री करा, कधीच वाईट कर्म घडणार नाही.
॥शुभ सकाळ ॥
**************************************************************
 'मन' ओळखणारयांपेक्षा  मन जपणारी माणसं हवीत... कारण, ओळखणारी ही  क्षणभरासाठी असतात तर 👏🏻 जपणारी आयुष्यभरासाठी!!!
 *शुभ सकाळ *
**************************************************************
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते...
उन्हात चालताना सावलीची गरज असते...
जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते...
आणि...  
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
शुभ सकाळ
**************************************************************
चांगल्या लोकांचा मान कधी कमी होत नाही,
सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत
कमी होत नाहीं,
चुकणं ही 'प्रकृती',
मान्य करणं ही 'संस्कृती' आणि
सुधारणा करणं ही 'प्रगती 'आहे.
जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा
महालात आणि गरीबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!
! शुभ सकाळ !
*****************************************************
आपुलकी असेल,                        
तर जिवन सुंदर..
फुले  असतील,
 तर बाग सुंदर...
गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
 तर चेहरा सुंदर...
आणि....
 नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर...
शुभ सकाळ
*****************************************************
चांगली वस्तू .....
चांगली व्यक्ती .....
आणि .....
चांगले दिवस .....
 यांची किंम्मत निघून गेल्यावरच  कळते.....
शुभ सकाळ
*****************************************************
परिवारा पेक्षा_श्रेष्ठ_पैसा_नाही
वडीलां पेक्षा_श्रेष्ठ_सल्लागार_नाही.
आई पेक्षा_श्रेष्ठ_जग_नाही
भावा पेक्षा_श्रेष्ठ_भागीदार_नाही
बहिणी पेक्षा_श्रेष्ठ_शुभचिंतक_नाही
मित्रां_शिवाय_आयुष्य_नाही.
म्हणून परिवार शिवाय "जिवन" नाही.
      ••●‼शुभ सकाळ‼●••
   ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||
*****************************************************
आयुष्याच्या प्रत्येक वळनावर

 सगळं आपलच होत गेलं असतं तर

"गमवायची भीती" आणि  "मिळवायची किंमत" कधीच समजली नसती

शुभ सकाळ
*****************************************************
"विश्वास" इतरांवर
इतका करा की ,
तुम्हाला फसवताना ते
स्वतःला दोषी समजतील..
आणि
"प्रेम" इतरांवर❤
इतकं करा की ,
त्यांना तुम्हाला गमवायची
भीती राहिल...!!
चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला  स्वर्ग आहे.
शुभ सकाळ
******************************************************
काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत नसतात,
भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात,
मिळतात येथे माणसे लाखोनी,
हजारोंनी,
 पण तुमच्यासारखी माणसे रोजरोज मिळत नसतात.
त्यासाठी
फक्त "योग"असावे लागतात      
!!! सुप्रभात !!!
*******************************************************
जिवाला स्पर्श करणारा सुविचार
"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.   "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"        
 शुभ सकाळ                
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
***********************************************************
चांगली वस्तू .....
चांगली व्यक्ती .....
आणि .....
चांगले दिवस .....
यांची किंम्मत निघून गेल्यावरच  कळते.....
शुभ सकाळ
***********************************************************
व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते
ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तुत्वामुळेच नव्हे ...
तर त्याव्यक्ती सोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो ... आपण मोठे म्हणण्या पेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात .....!
शुभ सकाळ
***********************************************************
"नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं",
"मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं".
"जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही",
"हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो".....
शुभ सकाळ
 "तुमचा दिवस आनंदात जाओ"
*********************************************************
आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं.

सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही.

भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही.

हे जीवन एक गुपित आहे,  इथे सर्व काही लपवावं लागतं,

मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं...✍🏻
शुभ सकाळ
**********************************************************
"नळ बंद केल्याने नळ बंद होतो "
 "  पाणी नाही "

"घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होतं "
 " वेळ नाही "

" दिवा विझवल्याने दिवा विझतो "
"प्रकाश नाही "

" असत्य लपवल्याने असत्य लपतं"
" सत्य नाही "

"प्रेम केल्याने प्रेम मिळत "
 "वैर नाही "

" दान केल्याने धन जात "
 "लक्ष्मी नाही "

"जन्म आणि मरण आपल्या हातात नाही ; पण आयुष्य कसं जगायचं ते आपल्या हातात आहे .

 हसा खेळा मस्ती करा ; सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा !

शुभ सकाळ
आयुष्य खुप सुंदर आहे,आनंद घ्या
*******************************************************************
आवडत्या  व्यक्तीकडून मन दूःखी झाले तर हे वाक्य  लक्षात ठेवा...

दुःख  महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला  विसरा,

आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर दुःख विसरा...
शुभ सकाळ
******************************************************************

22 comments:

  1. खुपच सुंदर लेख

    ReplyDelete
  2. हृदय स्पर्शी अनमोल विचार,

    ReplyDelete
  3. अत्यन्त मार्मिक,आणि विचारनीय सुविचार.
    खूप खूप आभार.💐💐

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर विचार
    मनापासून खूप खूप आभार

    ReplyDelete
  5. अप्रतिम भाव दडले आहेत ह्या सुविचारात

    ReplyDelete
  6. अप्रतिम सुंदर विचार

    ReplyDelete
  7. खुप सुंदर शब्द

    ReplyDelete
  8. Prernadayee vakya aahet, khup chan!!!

    ReplyDelete
  9. खुप छान विचार आहेत

    ReplyDelete