""मराठी अंतरंग या साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे""

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा

https://www.facebook.com/marathiantarang

साडेतीन मुहूर्ताच वलय आहे
उत्तम दिनाचं महात्म्य आहे
सुखद ठरो हा छान पाडवा
त्यात असू दे अवीट गोडवा
शुभ पाडवा...!
शुभ शुभ पाडवा...!!!
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
**********************************************************
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
फक्त तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला…
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,
शांती,
समृद्धी…!!!
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा
**********************************************************
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
**********************************************************
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
**********************************************************
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

**********************************************************
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…
**********************************************************
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
**********************************************************
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्चा!
**********************************************************
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!
**********************************************************
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा.
**********************************************************
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
**********************************************************
नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष
**********************************************************
गुढी तोरणे उभारुनी दारी,
करू नव्या संकल्पाची वारी
मंगल दिनी मंगल समयी
सुख, समृद्धि येईल घरी !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

**********************************************************
समतेचे बांधू तोरण,
गुढी उभारू ऐक्याची !
स्वप्न आपुले
साकारण्यासाठी
हार्दिक शुभेच्छा
आजच्या शुभदिनी !
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा

**********************************************************
चैत्र पालवी फुलू दे ,
नवी स्वप्ने उमलू दे ,
गुढी पाडव्याच्या निमित्ताने
सुख-स्वप्ने सकारू दे !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

**********************************************************
सण मराठी
मन मराठी
उभारली गुढी
आज हर्षाची,
साद मनाची
हाक प्रेमची,
भेट अशी !
“नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा

**********************************************************
स्वागत नव वर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धिचे,
पड़ता द्वारी
पाऊल गुढीचे…!
“नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा
**********************************************************
पालवी चॆत्राची
अथांग स्नेहाची ,
जपणुक परंपरेची ,
ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची ,सम्पन्न्तेची ,
उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
वसंताची पाहाट घेउन आला ,
नव चैतन्याचा गोडवा …
समृद्धिची गुढी उभारू ,
आला चॆत्रचा पाडवा.
“शुभ गुढी पाडवा
**********************************************************
खूप झाली 31st
खूप झाली हैप्पी न्यू year पार्टी
आता येतोय आपला मराठमोळा दिवस
.
.
.
.
गुडीपाडवा ……
सर्वांना अगोदर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व मराठी लोकांपर्यंत पोचला पाहिजे हा संदेश
**********************************************************
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा !
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! 
थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
हिच यानिमित्त सदिच्छा ! 
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
**********************************************************
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणा सर्वाना  सुख समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! हिच  श्रीचरणी प्रार्थना.नववर्षाभिनंदन
**********************************************************
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
**********************************************************
सोमवार दिनांक २७/३/१७ पासून  मराठी वर्षाचा शेवटचा एक दिवस राहिला आहे..... धन्यवाद ....  असाच सहवास तुमचा  आयुष्यभर लाभो...   चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा...... ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेलं त्यांचे मी आभार मानलेच पाहिजेत.  त्यामध्ये तुम्हीही आहात. तुमचे मनःपुर्वक आभार!  . पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो .. दिनांक  २८/३/१७ पासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छासह भेटूया!
**********************************************************
माणसं भेटत गेली,मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला..या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या...
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...
नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा !
*********************************************************
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
********************************************************
गुढी नभात उंचवू स्वराष्ट्र शक्ती वाढवू।
भारती मना मनात हिंदू तेज जागवू।।
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा , शालिवाहन शक १९३९ चा प्रारंभ. 
आपल्या सर्वांना हिंदू नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

हे वर्ष आपणाला सुख समृद्धी व भरभराटीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना..
********************************************************
नविन वर्षात आपणास 
शिवनेरीची श्रीमंती 
रायगडाची भव्यता 
प्रतापगडाची दिव्यता 
सिंहगडाची शौर्यता 
सह्याद्रिची उंची लाभो 
हिच शिवचरणी प्रार्थना 
आता येतोय आपला 
मराठमोळा दिवस 
गुढीपाडवा 
सर्वांना मराठी नुतन 

वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.......................
*********************************************************
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, 
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्ने्हाने साजरा करा पाडव्याचा सण
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 
              आणि
येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीने, भरभराठीचे "राहो".....

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
*********************************************************
गुढी मराठी मनाची
गुढी मराठी अस्मितेची
गुढी मराठी पंरपरेची
गुढी मराठी दिवसाची
गुढी मराठी वर्षाची
गुढी मराठी आभिमानाची
गुढी मराठी विश्वासाची
गुढी मराठी संस्कुतीची
गुढी मराठी नात्याची
गुढी मराठी आपुलकीची
गुढी मराठी स्वाभिमानाची
एक गुढी स्वामी समर्थांची
एक गुढी माझ्या छञपतीची
एक गुढी विर मावळ्याची
एक गुढी गणपती बाप्पाची
एक गुढी संत तुकोबाची
एक गुढी ज्ञानोबाची
एक गुढी रामदास स्वामीची
एक गुढी आईची
एक गुढी बाबांची
एक गुढी बहीनीची
एक गुढी भावाची
एक गुढी मिञाची
एक गुढी प्रेमाची
एक गुढी सुखाची
एक गुढी दुखाची
एक गुढी स्वप्नाची
एक गुढी सत्याची
एक गुढी नवचैत्यनेची
एक गुढी उत्सावाची
अशीच एक एक गुढी तुमच्या दारी लागो । आणि तुमच नविन वर्ष सुख समुद्रीच जाव ...

 येणाऱ्या नविन मराठी वर्षाच्या  हार्दीक शुभेच्छा
****************************************************************

No comments:

Post a Comment