घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही...
जिवनांत आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकुन जातात...
शेवटच्या स्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात
" स्वामी तीन्ही जगांचा,
आई विना भिकारी..."
" आ " म्हणजे "आत्मा"
" ई " म्हणजे ईश्वर..."
आत्मा व परमात्मा यांचे एकरुप ती.."आई"
-------------------------------------------------------------
कोण म्हणतं लहानपण परत येऊ शकत नाही....
काही क्षण आई जवळ बसून तर बघा....
*****************************************
माझ्या आईने मला नसेल शिकवले पोळी करायला
पण तिने मार्ग दाखवला 'आपली पोळी कमवायला'
माझ्या आईने मला नसेल शिकवले साडी नेसायला
पण तिने शिकवले आहे 'पदर सांभाळायला'
माझ्या आईने मला नसेल शिकवले दारात रांगोळी रेखायला
पण तिने शिकवले आहे दारी आलेल्याचा मान
राखायला
माझ्या आईने मला नसेल शिकवले भरतकाम करायला
पण तिने शिकवले आहे नात्यांची नाजूक वीण घट्ट ठेवायला
माझ्या आईने मला नसेल वाढवले 'एक मुलगी' म्हणून
पण तिने मला घडवले आहे एक 'व्यक्ती' म्हणून
Dedicated to all lovely ladies
*******************************************
थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण 😥
पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करत...
म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...!
अगदि आपल्या आई-वडीलांसारख....!!
******************************************
No comments:
Post a Comment