""मराठी अंतरंग या साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे""

छत्रपती शिवाजी महाराज

ज्याच्या पराक्रमाचा पाढा
अंतरी रुजावा
देव एक तो ची भजावा
मातीवर पडुन थेंब रक्ताचा थिजावा
त्याच चरणी देह
भक्ताचा झिजावा
शिवबा...
थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले

ll एकच आवाज एकच पर्याय ll
ll जय जिजाऊ जय शिवराय ll
           ⚔शुभ रात्री ⚔
------------------------------------------------------------------
।।मराठा म्हणावे अशा वाघराला।।

दिला एकदा शब्द न पालटावा। पुढे टाकला पाय मागे न घ्यावा ।।
धरें जो स्वयंभू शिवाजीपथाला।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१।।

कधीँ शत्रूचे घाव ना पाठीवरती ।
रणीं झेलतो सिंहसा धातीवरती ।।
हाकारुनी आव्हानतो जो यमाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२।।

जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल ।
तिला साडीचोळीनिशीं पाठवील ।।
कधीं स्वप्नीँ ना पाप स्पर्शेमनाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३।।

महावादळांच्या विरोधांत ठाके।
पुढें संकटांच्या कधीं हि न वाके ।।
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला ।
मराठे म्हणावे अशा वाघराला ।।४।।

मनीं धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा ।
उरीं देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा।।
सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रुवाला ।
मराठा म्हाणावे अशा वाघराला ।।५।।

दमे ना थके ना झुके ना हटे ना ।
कधीं हिन्दवीराज्यमार्गीँ चळे ना ।।
निराशा न स्पर्शेकधीं हि उराला।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६।।

खडे सैन्य घेई अटकपार जाई।
जिथें म्लेंच्छ भेटे तिथेँ सूड घेई।।
सदा धाव ज्याची असे उत्तरेला।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।७।।

पुरा ठार मारावया शाहिस्त्याला ।
घुसुन लालमहालीं करे खड्गहल्ला ।।
भिती स्वप्नीं ना स्पर्शते काळजाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।८।।

आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला ।
मुलाचे त्यजून धाव घेई गडाला ।।
स्वतःच्याहुनी मायभू श्रेष्ठ ज्याला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।९।।

निखार्यातुनी हासत चालणारा।
विना ढाल हि शत्रूशी झुंझणारा।।
भितो म्रत्यु हि स्पर्श करण्या जयाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१०।।

कुणी वीट मारे दगड हेच उत्तर ।
दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर ।।
स्वये होई वणवा गिळाया आगीला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।११।।

घणाघात घालू मुघलतख्त फोडू ।
पुरे जाळुनी राख पाताळी गाडू।।
अटकपार सूडार्थ आसूसलेला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१२।।

फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंना ।
तसा चित्तीँ ध्यातो शिवा काशिदाना ।।
सदा सिध्द त्रयीवत तनु झोपण्याला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१३।।

शिवा काशिदांचा असामान्य त्याग ।
मला हि असा लाभू दे कर्मयोग।।
असे मागतो नित्य तुळजापदाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१४।।

कुणी क्रुर भेटे बने लक्ष क्रुर ।
त्वरे मारतो पोट फाडूनी ठार।।
शिवाजी जसें फाडिती अफझल्याला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१५।।
पुण्यश्लोक छत्रपती श्री. शिवाजी महाराज की जय ।

धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज की जय ।

भारत माता की जय ।
हिंदू धर्म की जय ।
----------------------------------------------------------------
शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!

1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका

पण मला भावलेले शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!

1.आपल्या "आईला सती जाण्यापासून रोखणारे" शिवाजी महाराज सामाजिक क्रांती करणारे होते...!

2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे लोकपालक राजे होते...!

3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे उत्तम प्रशासक होते...!

4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक होते...!

5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे स्व-धर्मचिकित्सक होते ...!

खर्या अर्थाने ते लोकराजे होते कारण ते सर्व धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती.....!

शिवाजी  म्हणजे

शि = शिका

वा = वाचा

जी = जिंका

🏇🏇🏇🚩🚩🚩🏇🏇🏇

 जय शिवराय !जय महाराष्ट्र !
-------------------------------------------------------------------------
एक दिवस आली ती सुंदर
पहाट सगळी कडे चमचमाट,

विजांचा कडकडाट, ढगांचा
गडगडाट, आशा चिञ विचिञ
वातावरणात "भवानी मातेच्या
मंदिरात" शिवनेरी गडात ।

जन्मली एक वात जि करणार
होती मुघलांचा नायनाट,

मराठ्यांचा सरदार हिँदवी
स्वराज्याचा आधार शहाजीचा
वारसदार "छत्रपती शिवाजी
महाराज"

"जय महाराष्ट्र"
*********************************************

No comments:

Post a Comment