""मराठी अंतरंग या साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे""

विनोद

एकदा एक मुलगी आपल्या बॉय फ्रेंड च्या मोबाइल वरुण स्वताचा नंबर डायल करते.
.
मुलगी : "बघु त्याने काय नाव टाकले आहे माझे त्याच्या मोबाईल मध्ये ?
.
"मुलगी नाव बघताच बेशुध्द होउन जाते . .
.
.नाव होत . ."झाडू वाली मावशी"
***********************************************************
पति.. रागात येऊन सासूला sms पाठवतो..

“तुमची वस्तू बिघडली आहे, दिवसेंदिवस अन्न बेचवच बनत आहे"

सासू उत्तर देते..

“तुम्ही वस्तू घेउन तीन वर्ष  झाले, वॉरंटी संपली. आता बिघडलेल्या वस्तूस उत्पादक जबाबदार नाही "
***********************************************************
मन्या पहील्यांदा मुलगी बघायला गेला

मुलीचा बाप : बेटा, दारू पीताेस का?
.
.
मन्या: ते नंतर, आधी पोहे आणि चहातर होऊद्या
************************************************************
बायको:  माझी एकअट आहे!😕

नवरा :    काय?😳

बायको:   तूम्ही सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार

नवरा:      माझी पण एक अट आहे?

बायको:   काय?

नवरा:      मी घ्यायला आलो तरच परत यायचे?
****************************************************************
एक काळ होता
रात्री 12 वाजेनंतर
भूतांच राज्य असायंच,
परंतु  WhatsApp आणि
Facebook ने त्यांचा
रोजगार हिसकाहून घेतलाय.
************************************************************
देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या आशिर्वादामुळे
आज मी BMW 750 घेतली आहे..
.
BMW (Bisleri Mineral Water) 750ml
काय करू खूप तहान लागली होती.रागा - रागात घेतलीच मग..!
**************************************************************
मुलगा :- मला लग्न करायचे नाही मला सगळ्या बायकांची भीती वाटते.

बाप :- लग्न कर...नंतर एकाच बाईची भीती वाटेल बाकीच्या चांगल्या वाटतील. 😜
*************************************************************
बड्या: मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ?
पिंट्या : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
बंड्या : कितीजण होते धावायला. ?
पिंट्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी....!!!
**************************************************************
एकादी मुलगी आवडत  असेल तर स्पष्ट पणे तिला प्रपोज करा...
उगाच ऍम्ब्युलन्स असल्या सारखे तिच्या प्रत्येक फोटो वर वॉव वॉव  करत बसु नका....
**************************************************************
गावची शाळा

गुरजी :-
पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते.
रोज एक गिलास दुध पेत जा.

बंड्या:-
 काई बी सांगुन  रायले काय गुरजी,
तसं असतं तं मंग
वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.?
*************************************************************
बापू - दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या???
तात्या :- अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही. पी तु .!!
************************************************************
ताज महाल तों हम भी बनालेते
लेकीन
भावकी धड नाय ना आमची
उद्या वाटणी मागतील. ..
************************************************************
फुल2आगरी style

देवराम: ए बाला इक्र य.
वेटर : क पाजे क तुला?
देवराम : १काॅपी कितीला ह?
वेटर : २० रुपे
देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क?
वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय
**************************************************************
मुलगी : (boy friend la) ,
            सोमवार खरेदी ,
            मंगळवार हॉटेल ,
            बुधवारी फिरायला ,
            गुरुवारी जेवायला ,
            शुक्रवारी पिक्चरला ,
            शनिवारी पिकनिकला किती मस्त मजा ....!!!
boy friend  : होना रविवारी मंदिर ....
मुलगी : कशाला ...?
boy friend   : भीक मागायला ....!!!!
 तुझ्यात जीव रंगला
**************************************************************
मामा : अरे आपल्या गावातील ATM मशीन बंद पडलेय.

भाचा :  का ?

मामा : अरे तुझी मामी पहिल्यांदा पैसे काढायला गेली होती.

भाचा : मग काय झालं ?

मामा : अरे PIN टाका आल्यावर तुझ्या मामीनी डोक्याची पिन काढून त्यात घुसवली.. सगळा गाव  बोम्ब मारतोय मामीच्या नावाने.....
***************************************************************
आई : बेटा तु केस का कापत नाही ?

मुलगा : फॅशन आहे आई.

आई. : गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय लहान मुलगी पसंत आहे म्हणून.
आता जा नांदायला
****************************************************************
कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळलेल्याला कळेल.न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवले की कळलेल्याला कळलेलं न कळलेल्याला कळेल.
**************************************************************
रात्री १२ वाजता मुली ने प्रियकराला फोन केला
" हलो...., घरी कोणीच नाहीये..."
मुलगा धावत पळत तिच्या घरी पोहोचला,
आणि
खंरच तिथे कोणीच नव्हतं लॉक होते घराला......

मुलाने परत फोन लावला घरला कुलूप आहे ,
मुलगी होय रात्री चोरी होईल तिथेच बाहेर झोप ,आम्ही सकाळी येतो.....
*************************************************************
एका पार्टीमध्ये दोन महिला एकमेकीना अजिबात सोडत नव्हत्या.

अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारीशेजारीच पकडायच्या.
कहर म्हणजे, एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची स्वच्छ पुसून देत होती!

हे पाहून जमलेले सर्व जण
खूप आश्चर्यचकित झाले.
किती प्रेम हे!!!

नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की,

त्या दोघी नणंद-भावजया होत्या आणि एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता!!
*************************************************************
गुलाम बनकर जिओगे तो.कुत्ता समजकर लात मारेगी ये दुनिया.....नवाब बनकर जिओगे तो,सलाम ठोकेगी ये दुनिया.
असे स्टेटस ठेवणार्याना शेजारचे बीस्कीट चा पुडा आनायला पाठवतात
*************************************************************
सध्याच्या परीस्थिती वरुन मला असं वाटतंय की...
.*IPL पण BJP च जिंकेल.*
*************************************************************
आज शनिवार आहे...
हा मेसेज 20 जणांना पाठवा.

ऊद्या रविवार येइल.
**************************************************************
साला फेसबुक वर #fake_account काढायची पन हद्द झाली..

#महात्मा_गांधीची Request आलीय.
**************************************************************
एकदा आपलो एक मालवणी माणूस अमेरिकेक गेलो. 🌍

थय एका बिल्डिंगला आग लागली.

मालवणी माणसान फायर ब्रिगेडवाल्यांका सांगितलान -
'तुम्ही माणसांका खाली टाका मी पकडतंय.
(माका फणस पकडुची सवय आसा).

आधी त्या मालवणी माणसान एका बाईस झेलल्यान.
नंतर एका बारक्या पोरीक.
नंतर एका मोठ्या माणसाक.

नंतर एका नीग्रोक वरतून फेकल्यानी

हेनी तेका सोडून दिल्यान आणि जोर-जोरात ओरडलो -
अरे अक्करमाशांनू,
जे जळालेले हत त्यांका कशाक फेकतास?
*************************************************************
जे घर हौसे ने बांधलेले असते त्याला HOUSE म्हणतात...
ज्या घरात होम हवन चालतात त्याला HOME म्हणतात...
ज्या घरात हवा जास्त खेळती असते त्याला HAVELI म्हणतात...
ज्या घराच्या भिंतीला सुद्धा कान असतात त्याला MAKAN म्हणतात...
ज्या घरात गर्मी होत असून सुद्धा झोप चांगली येते त्याला ZOPADI म्हणतात...
आणि
ज्या घराचे हफ्ते फेडून-फेडून लोक आडवे होतात त्याला FLAT म्हणतात.....
**************************************************************
एक शंका होती विचारू का?

वाघ बकरी चहा उपवासाला चालतो का ?

[सहज, आपली एक शंका ]
**************************************************************
याला म्हणतात कलीयुग

बाप :- कुठे आहेस ??
.
पोरगा :- मित्राच्या रुमवर आहे, उद्या गणिताचा
पेपर आहे तर अभ्यास करतोयत आम्ही सगळे,
तुम्ही कुठं आहात ??

बाप :- बीयर शॉप च्या समोर असलेल्या
रांगेत सर्वात शेवटी आहे,
मला पण एक घे, दुकान बंद व्हायचा
टाईम झालाय..
***************************************************************
पाण्यामुळे लोखंड गंजने ,
थंडीमुळे सर्दी होणे ,
वाऱ्यामुळे झाडाची पाने हालने ,
आणि

मुलींमुळे मुले भिकारी होणे
हा निसर्गाचा नियमच आहे.
**************************************************************
या ग्रुपवर किती जणांचे व्हाट्सअप चालू आहे त्यानी
☝हे चिन्ह वापरून हजेरी द्या
म्हणजे बाकी नंबर काढून टाकायला मदत होईल
कारण
ग्रुपवर ''भजनाला आठ अन जेवायला साठ'' अशी गत झालेली आहे
**************************************************************
हार्ट ॲट्ॲक आलेल्या व्यक्तीला मित्रांनी विचारल अंतीम इच्छा सांग.

ते म्हणाल मेमरी कार्ड तेवढ चितेसंग जाळा.
**************************************************************
एका लग्नात नवरी ने घेतलेला उखाना -
' लाल मणी तोडले
काळे मणी जोडले..
चंदू  रावांसाठी मी
सात जण सोडले..'
नवरदेव भर लग्नातून ऊठून पळाला..
*******************************************
आता ही अफवा कोणी पसरवली
कि
शेतामध्ये  मोदी चा पुतळा लावला तर शेतात पण काँग्रेस ऊगवत  नाही .

तणनाशकाचा खर्च पण वाचतो
*****************************************
बंड्याने संस्कृत च्या गुरुजींना विचारले  गुरुजी
 येन रूक नपाम्रधु।
येन रूक नपाद्यम॥
या श्लोकाचा अर्थ काय हो  !

गुरुजींनी अनेक ग्रंथां मध्ये हा श्लोक शोधला.भरपूर मेहनत घेतली जंग जंग पछाडले
पण कुठेच काही शोध लागला  नाही.
२-४ दिवसांनी गुरुजींनी बंड्यालाच विचारले,
" बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ? "
बंड्या  गुरुजींना म्हणाला - " हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी...
गुरुजीं बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले.. तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवले,
गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला..
बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता. तिथं लिहीलं होतं
धूम्रपान करू नये।
मद्यपान करू नये॥

सध्या  बंड्या गरम पिशवीनं शेकुन  घेतोय.
*********************************************
आज तर हद्दच झाली..

गण्याने fb वर स्टेटस अपडेट केलं

"शुक्र करो, की मेरी कोई मुमताज नही वरना,

हर गली मे एक एक ताजमहल होता.

त्यावर बाळ्याची कॉमेंट आली

"घरच्या पत्र्यावर तुराटया टाक आधी  उन्हाळा सुरू झालाय..."
****************************************
गरमीच्या दिवसां मध्ये फिरायला जाण्याची थंड हवेची ठिकाणे
1) HDFC BANK
2) ICICI BANK
3) AXIS BANK
4) KOTAK MAHINDRA BANK
5) CITY BANK

चुकून सुद्धा SBI,BOB,BOI,BOM
आदि ठिकाणी जाउ नये..
 A.C. SLOW असतो

 जनहिता मध्ये जारी
 *********************************************
आज कालच्या बायका आपल्या मुलांना शाळेत पाठवताना टाटा करतात,
किस करतात. जणू काय मुलगा शाळेत नाही परदेशी चाललंय..?

आणि एक आम्ही होतो .
लाथा,बुक्या खाल्ल्याशिवाय शाळेत गेलोच  नाही..!
************************************************
पूण्यातील
मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर
कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं....
मु लि ब घा ग्रुप ....
तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या
दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे
या मित्रांनीपण ग्रुप तयार केला....
दा ख वा ना म ग ...
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी
कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस
यांनी पण आपला ग्रुप तयार केला
का ना खा लि दे उ का ....
******************************************************
कोंबडीच पिल्लू कोंबडीला विचारते
आई माणसांच्यात  जन्मलेल्या बाळाचे लगेचच नांव ठेवतात .,मग आमच का नाही ठेवत.
कोंबडी,.:-आपल्यात मेल्यावर ठेवतात .


चिकन चिली
चिकन मसाला
चिकन लाँलीपाँप
चिकन तंदूर
चिकन 65
चिकन सुप
चिकन मंचूरी
*************************************************************
बंड्या मित्राच्या लग्नात सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होता…..
तेवड्यात त्याला नवरदेवाणे जवळ बोलावले
आणि विचारले हे काय करतोयस?

बंड्या : दिसत नाय का रताळ्या ब्रेक डांस हाय..
*************************************************************
रावण कोर्टात
वकील : गीतेवर हाथ ठेऊन शपथ घ्या.
रावण :ठेउच् शकत नाही.
वकील :का ?
रावण : अजुन सिताचाच matter मिटला नाही तर……. गीता ला कोण हाथ लावेल?
वकील गेला वनवासाला 😀
**************************************************************
एक सुंदर मुलगी एका मेडिकल स्टोअर
च्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती.
मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट पाहत होती.

मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होता.

थोड्या वेळा नंतर मेडिकल मधील गर्दी कमी झाली.

ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आत गेली
आणि एका सेल्समन ला कोपऱ्यात बोलावले...

मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू लागला..

त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधून काढला
आणि सेल्समन च्या हातात देऊन म्हंटली,
"" भाऊ.....,
माझं एका डॉक्टर सोबत लग्न जमलं आहे
आज त्याने पहिलं लव्ह लेटर पाठवलं आहे
अक्षर समजत नाही......
जरा वाचून दाखवा ना....?
************************************************************
मास्तर :- अशी कोणती  बाई आहे, तीला १००% माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे ??

गण्या डोकं खाजवतं.....
विधवा बाई...!!

मास्तर जीव देऊन मेला.... 
**********************************************************
तुम्हाला जर इंग्रजी येत असेल,
तर fast वाचून दाखवा..
My
A My
They My
They They My
A My They Na My

हा हा हा हा हा

सुट्टे नाहीत माफ करा.

पुढच्या  ग्रूपवर जा.
*************************************************************
Confusing joke....हुशार माणसांसाठी

आई :-  बंटी दुकानातून १ दुधाची पिशवी आण आणि अंडी असतील तर ६ आण.

बंटी :-  आई ६ दुधाच्या पिशव्या आणल्यात.

आई :-  मेल्या १च पिशवी सांगितली होती.

बंटी :-  आई दुकानात अंडी होती म्हणून ६ आणल्या.

समजलं नसेलंच ......
परत वाचा.
************************************************************
युद्धाला जाण्याअगोदर राजा ने आपल्या सुंदर राणीच्या खोलीला कुलूप लावले..

आणि चावी आपल्या जिगरी मित्राकडे  दिली..
आणि राजा म्हनाला..
हे बघ मित्रा 4 दिवसात मी आलो नाही तर तू कुलूप उघड
आणि राणी तुझी...
.राजा घोडयावर बसुन निघुन गेला..
राजाच्या गेल्यानंतर नंतर अर्ध्या तासाने..
राजाने मागे पाहिले,...तर त्याचा मित्र जोरात घोडयावर बसुन येत आहे..
राजा थांबला आणि म्हणाला
काय दोस्ता काय झाल??
दम खात खात मित्र बोलला..

काय राव हि चावी  त्या कूलपाची नाही !!
*******************************************************
पती : खुप दमलाे,थकलो आहे जरा पटकन चहा करुन दे.
पत्नी : आले टाकू का,
पती : ओके
पत्नी :गवतीचहा,वेलची टाकू का ?
पती : ओके चालेल
पत्नी : तुळस,लवंग टाकू का?
पती : हो ठीक आहे
पत्नी : पुदिना टाकू का?
पती (रागाने): तुझ्या आयला.......कांदा, लसून, हळद,दालचीनी, जिरे, मोहरी पन टाक आणि फोडणी दे...
आणि वाट लावून टाक चहा ची.....

मी चाललाे दारू प्यायला....
******************************************************
एक मुलगा हरवला ...

म्हणून घरच्यांनी WhatsApp वर त्याचा फोटो आणि मेसेज बनवून टाकला.

तो मुलगा लवकरच सापडला, WhatsApp चे त्यांनी शतश: आभार मानले.

पण आता तो मुलगा ३ महिने झाले शाळेत जाऊ शकत नाहीये कारण रस्त्यात ज्याला तो मुलगा दिसतो तो त्याला घरी आणून सोडतो कारण तो मेसेज WhatsApp ला अजूनसुद्धा फिरतोय
*****************************************************
31 मार्च ला वातावरण एकदम शांत आणी उदासीन रहाणार आहे
कारण मुकेश अम्बानीनी चालु केलेला जिओचा भंडारा बंद होणार आहे ..

भगवंत सर्वांना दुःख झेलायची शक्ति देवो ..
****************************************************
Life_मधे_गर्लफ्रेंड नसली तरी चालेल
पण  exam_मधे_objectives  पाहिजेच 
राव ...तेवढ्यावरच आम्ही पास होतोय..
धिना धिन धा__!!
तूझ झाल की मला दाखव.संघटना.
****************************************************
मास्तर : Architecture म्हणजे काय ??
विद्यार्थी : सैराट मध्ये आर्चीने जे टेक्टर चालवलंय त्याला 
आर्चीटेक्टर म्हणतात.
मास्तरनी विहिरीत उडी मारली 
****************************************************
रिक्षावाला - हां madam .. ये आ गया आपका "विठ्ठलनगर"..
बाई - अरे नई नई यहा नई.. वो आगे वो 'चिंचेका' झाड दिखता है ना
वहासें 'उजवीकडे वळके' थोडा आगे...
रिक्षावाला - अरे madam .. २० रु. मै यहा तक ही आता...
बाई - क्या आदमी हो... अरे कुछ 'माणुसकी' है की नही...
थोडा आगे छोडोंगे तो क्या 'झीझेंगा' क्या तुम्हारा रिक्षा.... .
***************************************************
मास्तर :  कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।
बंड्या याचा अर्थ सांग?
बंड्या:  करमत नसल्यामुळे
राधिका रस्त्यावर फिरत असते,
कदाचित तिला फळ घ्यायचे असतील  !
 मास्तर कोमात
****************************************************
 गुरूजी :  बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! याचा अर्थ काय ?

बंड्या : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे !
***************************************************.
"दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा" याचा अर्थ काय ?

बंड्या : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला... जनका... तुझी मजा आहे !

मास्तर सैरा वैरा पळत आहेत

 गुरूजी- बंड्या, याचा अर्थ सांग
" हे पार्थ त्वया चापि मम चापि...!"

बंड्या - हे अर्जुना, तू (शांतपणे) चहा पी, मी पण पितो.

गुरुजींनी चहा कायमचाच सोडला
************************************************************
भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत -

१. मारी गोल्ड आणि
२. पारले जी

एक कपात जात नाहीं...

दूसऱ कपात गेलं तर परत येत नाही !

***********************************************************
अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या . ..

वीणा वर्ल्ड वाले "सिनियर सिटीझन". .आणि मेक माय ट्रिप वाले "हनिमून कपल्स"...

ट्रिप मॅनेजर पुणेरी होता.त्या वेळेचा एक उत्स्फूर्त विनोद ....

"केसांना मेंदी लावलेले" या बाजूला या. .. "हाताला मेंदी लावलेले".. त्या बाजूला जा...!
***********************************************************
कडक जोक
मुलगी:-माझा📱मोबाईल आईजवळ असतो.
 मुलगा- मी फोन केला तर तु पकडली जाणार नाही ना?...
मुलगी:- तुझा नंबर बँटरी लो नावाने सेव्ह केला आहे
जेंव्हा कधी तुझा फोन येतो तेंव्हा आई म्हणते हे घे चार्जिंगला लाव
मुलगा जागेवर खाली कोसळला..........
**********************************************************
अरे अंबानी, तू इतका कठोर का झालास.
एका बाजूला ज्यांचं नेट वापरणं आम्ही सोडलं ते आम्हाला विसरतात.
आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला फुकट नेट वापरायची सवय लावली तो तू हि आम्हाला विसरतोय.
मग विस्कटलेल्या नेटवर्कचे हे सापळे घेऊन करुणाकरा
आम्ही नेट वेड्यांनी कुणाच्या टॉवरवर डोकं आदळायचं रे

एक नेटसम्राट
*******************************************************

1 comment: